परवानगीशिवाय लग्नाची वरात काढल्यास गुन्हा दाखल होणार! सोलापूर शहर पोलिसांचा इशारा

परवानगीशिवाय लग्नाची वरात काढल्यास गुन्हा दाखल होणार! सोलापूर शहर पोलिसांचा इशारा

सोलापुरात आता लग्नाची वरात काढण्यासाठी पोलीस परवानगीची आवश्यकता आहे. विनापरवानगी व बेकायदेशीर बरात काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस विभागाने दिला आहे. नुकतेच विनापरवानगी लग्नवरात काढल्याप्रकरणी नवरदेव, डीजेचालक, नृत्यांगना व आयोजकांसह सहाजणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापुरात अलीकडील काळात सार्वजनिक कार्यक्रम व कौटुंबिक कार्यक्रमात डीजे लावणे, डॉल्बी लावणे आणि सार्वजनिक रस्त्यावर नृत्यांगना आणून नृत्य करण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कठोर भूमिका घेत शहरातील मुख्य रस्त्यावर विनापरवानगी व बेकायदेशीर लग्नाची वरात काढल्यास वाहतुकीस अडथळा व ध्वनिप्रदूषण नियमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

अंतर्गत रस्त्यांवरून मुख्य रस्त्यावर लग्नाची वरात काढण्यास परवानगी मिळणारच नाही. नियमांचे उल्लंघन करून लग्नाची वरात काढणाऱ्या आयोजकासह नवरदेवावर गुन्हे दाखल होत आहेत. नुकतेच सदर बझार परिसरातील श्री शीतलादेवी मंदिराजवळ लग्नाच्या वरातीत डीजे लावून भररस्त्यावर नृत्यांगनांना नाचवत मिरवणूक काढण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी नवरदेव, नृत्यांगना, डीजेचालक, आयोजक यांच्यासह सहाजणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“लग्नाची वरात शहरातील रस्त्यांवरून विनापरवानगी काढण्यास मनाई आहे. वाहतूक नियम व आवाज प्रदूषण नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. लग्नवरात काढण्यासाठी पोलीस परवानगीची आवश्यकता आहे.”

– विजय कबाडे, पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;