“धनंजय मुंडे यांनी डोकं लावून…”, आरोपपत्र दाखल होताच अंजली दमानिया आक्रमक, CM-DCM चा उल्लेख करत म्हणाल्या…

“धनंजय मुंडे यांनी डोकं लावून…”, आरोपपत्र दाखल होताच अंजली दमानिया आक्रमक, CM-DCM चा उल्लेख करत म्हणाल्या…

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सीआयडीने 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. वाल्मीक कराड हाच खरा सूत्रधार असल्याचेही यात नमूद करण्यात आले. तसेच खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे नाव घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला चढवला आहे.

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या प्रकरण असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आरोपपत्रामध्ये हे तीनही गुन्हे एकत्रित करण्यात आले आहेत. यावर माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘राजकीय दबाव होता म्हणून तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. हा दबाव धनंजय मुंडे यांचाच होता. त्यामुळे पहिल्या दिवसापासून मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत होते.’

वाल्मीक कराडच सूत्रधार, संतोष देशमुख खून प्रकरणात सीआयडीकडून 1800 पानांचं आरोपपत्र दाखल

बीडमध्ये प्रत्येक दुकानदाराकडून खंडणी, हप्ते फिक्स असतात. यामागे मोठे सिंडेकेट असून हे कोणाच्या आशीर्वादाने? हे फक्त धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने असून संतोष देशमुख प्रकरातही तीन गुन्हे वेगळे करण्यामागेही राजकीय दबाव होता.

हे तीनही गुन्हे कधीच वेगळे नव्हते. वाल्मीक कराडला वाचवायचे म्हणून धनंजय मुंडे यांनी डोके लावून हे गुन्हे वेगवेगळे करायला लावले हा माझा आरोप आहे. आता जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही तर महाराष्ट्राने पेटून उठले पाहिजे, असेही अंजली दमानिया यावेळी म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग नव्हता असे कुणी म्हणत असेल तर ते मी कदापि मान्य करणार नाही. कारण वाल्मीक कराड मोठा होण्यामागे फक्त धनंजय मुंडे आहेत. त्यांच्याशिवाय दुसरा तिसरा कुणीही नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;