एकमेकांना हार घालताच प्राजक्ताने नवऱ्यासोबत केलं लिपलॉक; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ 

एकमेकांना हार घालताच प्राजक्ताने नवऱ्यासोबत केलं लिपलॉक; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ 

अभिनेत्री तथा युट्यूबर प्राजक्ता कोळी 13 वर्षांच्या रिलेशनला अखेर लग्नबंधनात अडकवलं आहे. प्राजक्ताने प्रियकर वृषांक खनालसोबत 25 फेब्रुवारी रोजी लग्न केलं. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच वेळी, आता प्राजक्ता कोळीने तिच्या लग्नाचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती वधूच्या पोषाखात लग्नाच्या स्टेजजवळ येताना दिसत आहे.
प्राजक्ताची एन्ट्री होताच वृषांक पाहतच राहिला 
व्हिडिओची सुरुवात प्राजक्ता कोळी म्हणजेच वधूच्या प्रवेशाने होते आणि वर म्हणजेच वृषांक तिला पाहताच तिला फ्लाइंग किस देताना दिसत आहे. त्याच वेळी, प्राजक्ता देखील वृषांककडे पाहत प्रेमाने इशारे करताना दिसत आहे. त्यानंर दोघेही एकमेकांमा हार घालतात आणि त्यांचं लग्न सेलिब्रेट करताना दिसत  आहेत. त्यावेळी प्राजक्ता प्रेमाने वृषंकच्या गालावर किस करतानाही दिसत आहे.
प्राजक्ता कोळीचे पती वृषांक खनालसोबत लिपलॉक
एवढंच नाही तर या व्हिडीओमध्ये प्राजक्ता कोळी आणि वृषांक खनाल एकमेकांसोबत लिपलॉक करतानाही दिसत आहेत. यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारतात. तसेच हे दोघे सात फेरे घेत लग्नाच्या इतर विधी करताना दिसत आहे. प्राजक्ता आणि वृषांक देखील जोमाने नाचताना दिसत आहेत. आता या जोडप्याच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

वधू आणि वराचे लूक कसे होते?
प्राजक्ता कोळीने तिच्या लग्नात डिझायनर अनिता डोंगरे यांनी तिच्यासाठी बनवलेला खास ब्राइडल लेहेंगा घातला होत.पारिजात पैटर्न और पिचवाई पेंटिंग आणि गोल्डन लेहेंग्यामध्ये प्राजक्ता फारच सुंदर दिसत होती. तसेच अनिता डोंगरे यांनी वृषांकसाठीही शेरवानी डिझाईन केली होती. वृषांकने आईवरी शेरवानी, डोक्यावर पगड़ी आणि डोळ्यांवर काळा चश्मा घातला आहे. वृषांक खनाल देखील वराच्या पोषाखात देखणा दिसत आहे. वधू-वराची ही जोडी सर्वांच्याच मनात भरली आहे. त्यांच्या व्हिडीओ आणि फोटोंवरही चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;