पवईतील जलवाहिनीला गळती; घाटकोपर, कुर्ला परिसरातील पाणीपुरवठय़ावर परिणाम

पवईतील जलवाहिनीला गळती; घाटकोपर, कुर्ला परिसरातील पाणीपुरवठय़ावर परिणाम

पवईतील व्हेंचुरी येथील 1800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या आणि 300 मिलीमीटर व्यासाच्या पर्यायी जोडणीवर आज अचानक मोठी गळती सुरू झाल्याने घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून दुरुस्तीसाठी 15 तास लागणार आहे. त्यामुळे घाटकोपर आणि कुर्ला परिसरातील  काही भागांच्या पाणीपुरवठय़ावर शनिवारी सकाळपर्यंत परिणाम होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. पवई व्हेंचुरी येथील जलवाहिनीला अचानक  गळती लागल्याने घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला येथील काही भागांत आजपासून शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरही काही वेळ कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवाशांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;