Chandrapur News – बसस्थानकात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, पोलीस चौकीला कुलूप

Chandrapur News – बसस्थानकात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, पोलीस चौकीला कुलूप

पुण्यात स्वारगेट बस डेपोमध्ये 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील बसस्थानकांवरील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. अशातच नवीनच बांधण्यात आलेल्या चंद्रपूर बसस्थानकाची सुरक्षा नावालाच असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बसस्थानकात असलेल्या पोलीस चौकीलाही कोणी वाली नाही. कारण पोलीस चौकीला सतत कुलूप लागलेले असते.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये एका युवतीवरील अत्याचाराच्या लांच्छनास्पद घटनेनंतर चंद्रपूर येथील मुख्य बसस्थानकाचा आढावा घेतला असता सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावरच असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. चंद्रपूरचे बसस्थानक नवे करकरीत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याचे उद्घाटन झाले. त्यामुळे भौतिक सुविधा बसस्थानकावर बऱ्यापैकी आहेत. हिरकणी कक्ष, स्वच्छतागृहाची अवस्था वाईट आहे. या परिसरात एक पोलीस चौकी असून, ती नेहमी बंद असते. पोलीस नावाची गोष्ट याठिकाणी बघायला मिळत नाही. पुण्यात घडलेल्या घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, आता वरिष्ठांकडून बसस्थानकांतील सुरक्षेची मागणी केली जाणार आहे. चंद्रपूर बसस्थानकावर सीसीटीव्ही आहेत. मात्र सीसीटीव्ही मॉनिटरिंगसाठी एकही कर्मचारी नाही. गर्दीच्या तुलनेत केवळ आठ सीसीटीव्ही असून, ते अपुरे पडत आहेत. रात्री मुक्कामी असणाऱ्या बसेस प्रतिबंधित क्षेत्रातील आगारातच असतात. पहाटेच्या गाड्यांसाठी 10 ते 15 कर्मचारी मुक्कामी असतात. आगार व्यवस्थापकाने पोलीस चौकी सुरू करण्यासंदर्भात पत्र व्यवहार केला, मात्र ती सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी सुरक्षेसाठी कुणाकडे बघायचे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;