मराठी भाषा गौरव दिन इंग्लिश स्कूलमध्ये साजरा

मराठी भाषा गौरव दिन इंग्लिश स्कूलमध्ये साजरा

मराठी भाषा गौरव दिन गायत्री अ‍ॅण्ड संत सावता इंग्लिश स्कूलमध्ये साजरा करण्यात आला. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन हा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

देशातील अनेक प्रमुख भाषांपैकी एक मराठी भाषा आहे. तसेच मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा देखील देण्यात आला आहे. मराठी भाषेची माहिती आणि महत्त्व शिक्षकांनी मुलांना पटवून सांगितले पाचवी व सहावीच्या मुलींनी ही माय भूमी, ही जन्म भूमी या गाण्यावर नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांनी भाषण केले. यावेळी शाळेच्या सचिव जाधव प्रियंका, मुख्याध्यापिका एस.एस. जगताप, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;