गावकऱ्यांकडून टीप मिळाली अन् पोलीस उसाच्या फडात घुसले; दत्तात्रय गाडे हाती कसा लागला? पोलिसांनी सांगितलं

गावकऱ्यांकडून टीप मिळाली अन् पोलीस उसाच्या फडात घुसले; दत्तात्रय गाडे हाती कसा लागला? पोलिसांनी सांगितलं

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय रामदास गाडे (वय – 35) याला मध्यरात्री गुणाट गावातून अटक करण्यात आली. गेल्या 70 तासांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर गावातील नागरिकांनी दिलेल्या टीपच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 500 पोलीस, ड्रोन कॅमेरे आणि डॉग स्वॉडच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू होता अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या तीन दिवसांपासून 500 हून अधिक पोलीस आरोपीचा शोध घेत होते. गुणाट गावातील नागरीकही यात सहभागी झाले होते. मध्यरात्री आरोपीला अटक करण्यात आली असून आज त्याला न्यायालयात हजर केले जाईल. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल, अशी माहितीही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

बलात्कारी घटना घडल्यानंतर पुढील दोन ते तीन तासांमध्ये सीसीटीव्हींच्या आधारे आरोपीची ओळख पटली होती. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले. सुरुवातीला आरोपी आढळून आला नाही. त्याला अटक करण्यात उशीर झाला. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. काही पोलीस अधिकारी गावात तळ ठोकून होते. स्थानिकांनी पोलिसांना मोठी मदत केली. अंधार असल्याने त्याला शोधणे कठीण होते. अनेक अडथळे आले, पण अखेर पोलिसांनी त्याला अटक केली, असेही त्यांनी सांगितले.

Pune rape case – दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या, 1 लाखांचं बक्षीस कुणाला मिळणार? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

एक लाखाचं बक्षीस कुणाला मिळणार?

पत्रकारांनी बक्षिसाबाबत प्रश्न विचारला असता पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, हे बक्षीस ज्या गावकऱ्याच्या माहितीवरून आरोपीला पकडण्यात आले त्याला देण्यात येईल. आरोपी पाणी पिण्यासाठी बाहेर आला होता, त्यावेळी कुणालातरी तो दिसला आणि त्यांनी पोलिसांना फोन करून सांगितले. त्यानंतर दुचाकी आणि ड्रोनद्वारे आरोपीचा माग काढण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. शेवटची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस देण्यात येईल.

गावकऱ्यांचे मानले आभार

यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आरोपीच्या शोधमोहिमेत मदत करणाऱ्या गुणाट गावच्या नागरिकांचेही मनापासून आभार मानले. गुणाट गावातील नागरिकांनी आरोपीला पकडण्यात खूप सहकार्य केले. त्यांचे खूप खूप आभार. गुणाट गावात जाऊन गावकऱ्यांचे आभार मानणार असून गावासाठी आम्ही काय करू शकतो ते करू, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;