विकीची टोपी काढली, मग त्याचा टीशर्ट मागितला; विकीसोबत मस्ती करणाऱ्या चिमुकल्याला ओळखलं का? छावामध्ये आहे खास सीन
लक्ष्मण उतेकरांचा ‘छावा’ सिनेमाने काय धुमाकूळ घातलाय हे आपल्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आज प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेल्या छावा चित्रपट हा कायम लक्षात राहणारा आहे. चित्रपटातील कलाकारही तेवढेच चर्चेत आहेत. विकीचं तर त्याच्या भूमिकेसाठी विशेष कौतुक होताना दिसत आहे. त्याने ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला न्याय दिला आहे त्याच्या या मेहनतीबद्दल सगळेच त्याची प्रशंसा करत आहेत.
विकिचा चिमुकल्यासोबतचा व्हिडीओ व्हायरल
चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे काही व्हिडीओ आणि फोटो आता व्हायरल होऊ लागले आहेत. असाच एक व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. जो छावाच्या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. या व्हिडिओमध्ये विकी चिमुकल्यासोबत मस्ती करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये जो चिमुकला दिसत छावा चित्रपटात झळकला आहेय. त्याचा छावा चित्रपटात एक छोटासा सीनही. चित्रपटात जेव्हा छत्रपती संभाजी महाराज बुऱ्हाणपूरमध्ये मुघलांवर चाल करून जातात तेव्हा तिथे होणाऱ्या लढाईत एक छोटा मुलगा त्याच्या आईपासून हरवतो. आणि तिथेच रस्त्यावर रडत असतो. जेव्हा हे चित्र संभाजी महाराज पाहतात तेव्हा तो मुघलांच्या गावातील मुलगा आहे हे माहित असूनही महाराज त्याला वाचवून सुखरूप त्याच्या आईकडे सोपवतात. असं दाखवण्यात आलं आहे. ‘छावा’मध्ये दिसलेला हा मुलगा तोच आहे. त्याचं नाव अझलान असिफ असं आहे. या चिमुकल्याच्या अकाऊंटवरुनच हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
विकीने चिमुकल्याला उचलून घेतलं अन्…
दरम्यान या व्हिडीओमध्ये हा चिमुकला विकीसोबत मस्ती करताना दिसत आहे. विकीने त्याला उचलून घेतलं असून तो त्याच्याशी गप्पा मारताना दिसत आहे. चिमुकला आधी विकीचा गॉगल घेतो. मग त्याची टोपीही काढून घेतो. तेव्हा विकी त्याला म्हणतो की “मला पण तुझ्यासारखा हेअरकट करायचाय. माझे केस खूप वाढलेत”. मुलाने टोपी घेतल्यानंतर विकी त्याला म्हणतो की,” मला तुझं टीशर्ट दे” त्यानंतर तो चिमुकलाच विकीचं टीशर्ट मागू लागतो. चिमुकल्याचं बोलणं ऐकून विकीलाही गमंत वाटते. त्यांच्या संभाषणानंतर विकी म्हणतो “हा खूपच हुशार मुलगा आहे. त्याला सगळंच हवंय”. तसेच तो मुलगा त्याच्या बोबड्या भाषेत विकीला त्याला वर हवेत फेकायला पण सांगतो. विकीचा चिमुकल्यासोबतचा हा क्यूट व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून कमेंटही केल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List