टकल्यावर उगवणार केस; जादुई तेलासाठी झुंबड, देशभरातून मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये उसळली गर्दी

टकल्यावर उगवणार केस; जादुई तेलासाठी झुंबड, देशभरातून मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये उसळली गर्दी

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये टक्कल पडलेल्या डोक्यावर आणि केस गळतीने हैराण झालेल्यांसाठी जादुई तेल आल्याचा दावा केला जात आहे. यासाठी देशभरातील तरुण आणि मध्यमवयीन लोकांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे.  दिल्लीतून आलेला सलमान भाई नावाचा माणूस हे तेल लावतो आणि त्यामुळे टकलावर केस उगवतात अशी बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली, परंतु सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाल्यानंतर हा सलमान भाई हादरला आणि तिथून पसार झाला. इंदूरमधील डाकाचाइरा परिसरात टकलावर केस उगवणारे जादुई तेल घेऊन हा तथाकथित सलमान भाई आला होता. त्याच्याकडून टकलावर हे तेल लावून घेण्यासाठी तरुण, प्रौढ व्यक्तींपासून ते वृद्धांनी प्रचंड गर्दी केली होती. पहाटेपासूनच लोकांनी रांगा लावल्या होत्या. गर्दी इतकी वाढली की, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांना तैनात करावे लागले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;