महाराष्ट्रात ‘आपले सरकार’ चालवणार गुजराती कंपनी! सिंधुदुर्गातील ‘सेतू’ अहमदाबादच्या ठेकेदाराला

महाराष्ट्रात ‘आपले सरकार’ चालवणार गुजराती कंपनी! सिंधुदुर्गातील ‘सेतू’ अहमदाबादच्या ठेकेदाराला

राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळवण्यात आले असतानाच आता राज्यातील सरकारी सेवांमध्येही गुजरातसाठी पायघड्या घालण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिह्यातील सेतू सुविधा केंद्रे अर्थात आपले सरकार सेवा केंद्र चालवण्याचा ठेका महायुती सरकारने गुजरातमधील कंपनीला दिला आहे. याविरोधात भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट पसरली असून शिवसेनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

परराज्यातील कंपनीला हा ठेका देण्यापूर्वी सरकारने जिह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा काहीच विचार न केल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. भूमिपुत्रांवरील या अन्यायाचा शिवसेनेने धिक्कार केला असून सरकारच्या या गुजरातधार्जिण्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

‘आपले सरकार सेवा केंद्र’ हे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी निर्माण केलेला एक रोजगाराचा मार्ग होता, मात्र महायुती सरकारने सिंधुदुर्ग जिह्यातील आठ तालुकास्तरीय आणि एक जिल्हास्तरीय अशी नऊ ‘सेतू सुविधा केंद्रे’ अहमदाबादमधील मे. गुजरात इन्पह्टेक लिमिटेड या परराज्यातील ठेकेदाराला चालविण्यासाठी दिली आहेत. सरकारच्या या निर्णयाबद्दल स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे.

  • सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडमार्ग येथील नागरी सुविधा केंद्र चालवण्यासाठी गुजरात इन्पह्टेक लिमिटेड कंपनीला मंजुरी देण्यात आली असून या कंपनीसोबत करारनामाही झाला आहे.

शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

गुजरातचं भलं हेच महायुतीचं धोरण, असे म्हणत शिवसेना नेते-माजी खासदार विनायक राऊत यांनी सरकारच्या या निर्णयाचा धिक्कार केला आहे. गुजराती व्यापाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील जमिनी एकीकडे खुलेआम मोकळ्या करणाऱ्या राज्य सरकारने आता ‘आपले सरकार सेवा केंद्र’देखील गुजराती व्यापाऱयांच्या कंपनीला देऊ केले आहे. शिवसेना याविरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला असल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.

आज या कंपनीच्या प्रतिनिधींनी सिंधुदुर्ग जिह्यातील ‘सेतू सेवा केंद्रा’च्या संचालकांना बोलावून त्यांच्यासोबत बैठक घेतली. या कंपनीच्या प्रतिनिधींनी विद्यमान केंद्र संचालकांना बोलावून आता ‘सेतू सेवा केंद्रा’चे काम आमच्याकडे आले आहे. प्रत्येक केंद्र चालकाने कंपनीला दोन लाख रुपये ‘नॉन रिफंडेबल डिपॉझिट’च्या स्वरूपात द्यावे आणि दर महिना वीस ते पंचवीस हजार रुपये द्यावेत, अशी मागणी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;