जेवणानंतर चहा किंवा काॅफी पिण्याची तुम्हालाही सवय आहे का? आजच ही सवय टाळा, नाहीतर होईल नुकसान

जेवणानंतर चहा किंवा काॅफी पिण्याची तुम्हालाही सवय आहे का? आजच ही सवय टाळा, नाहीतर होईल नुकसान

आपल्यापैकी अनेकांना जेवणानंतर चहा किंवा काॅफी पिण्याची सवय असते. परंतु ही सवय सर्वात घातक असून, यामुळे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकतो. जेवणानंतर शक्यतो काही न खाण्याकडे किंवा पिण्याकडे कल असायला हवा. यामुळे पचनक्रियेत बिघाड निर्माण होतो. म्हणूनच जेवणानंतर फळांसोबत थंड पाणीही न पिण्याचा सल्ला डाॅक्टर देतात.

जेवणानंतर चहा/कॉफी का पिऊ नये?

जेवणानंतर लगेचच चहा किंवा कॉफी पिणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून हानिकारक आहे. कारण यामुळे तुमच्या पचनक्रियेत अडचणी निर्माण होतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जेवणाच्या एक तासापूर्वी आणि एक तासानंतर चहा किंवा कॉफी पिऊ नये. कॉफी/चहामध्ये असलेले रसायन टॅनिन आर्यनमुळे पचनप्रक्रियेत अडथळे येतात. अतिरिक्त प्रमाणात चहा/कॉफी पिण्याच्या सवयीमुळे तुम्हाला अ‍ॅनिमियाचा त्रास देखील होऊ शकतो. सोबतच हात-पाय थंड पडणे, डोके दुखी आणि भूक न लागणे यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.

जेवणानंतर फळे खाणे टाळा

रिकाम्या पोटी फळांचं सेवन केल्यास शरीरास अधिक फायदेशीर ठरते. दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण किंवा नाश्त्यानंतर फळांचं सेवन करणं टाळावं. जेवणानंतर तुम्ही फळं खाल्ली तर फळांचं पचन योग्य पद्धतीनं होत नाही. शिवाय शरीराला फळांमधील पोषक घटक देखील मिळत नाहीत. तुम्हाला फळांचं सेवन करायचं असल्यास जेवणानंतर काही मिनिटांचं अंतर ठेवून फळे खावीत.

थंड पाणी पिऊ नये

पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी पाणी पिणे अतिशय गरजेचं आहे. पण जेवणानंतर तातडीनं पाणी पिणं टाळा. जेवणानंतर थंड पाणी तर अजिबातच पिऊ नये. जेवणानंतर लगेचच थंड पाणी प्यायल्यानं अन्नपदार्थ एकाच ठिकाणी साचून राहतात किंवा गोठतात. यामुळे पचन प्रक्रियेत बाधा निर्माण होते आणि जेवण पचण्यास जड जाते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, जेवणानंतर ४५ मिनिटांनंतर साधे पाणी किंवा कोमट पाणी प्यावे.

(कोणतेही उपचार करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;