‘आयआयटी’त आता ‘आयआयएम’चे शिक्षण, इंजिनीअरिंग कॉलेजमधून बीटेकसोबत एमबीए करता येणार

‘आयआयटी’त आता ‘आयआयएम’चे शिक्षण, इंजिनीअरिंग कॉलेजमधून बीटेकसोबत एमबीए करता येणार

नव्या शिक्षण धोरणांतर्गत आता देशातील अनेक प्रतिष्ठत संस्थेत काही बदल करण्याची जोरदार तयारी केली जात आहे. देशातील प्रतिष्ठत इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) प्रमाणे एमबीएसह अन्य क्षेत्रांतील कोर्स सुरू केले जाण्याची शक्यता आहे. या संस्थेत मॅनेजमेंट, ह्युमॅनिटीज, सोशल सायन्ससारख्या कोर्सची मागणी वाढली आहे. त्यामुळे आयआयटीत आता केवळ इंजिनीअरिंग कोर्सेस नव्हे तर मॅनेजमेंट, हेल्थकेअर मॅनेजमेंट, ‘एमबीए’सह स्किल बेस्ड कोर्सेस सुरू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्याप्रमाणे आयआयटीमध्ये इंजिनीअरिंग कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमध्ये पंपन्या प्राधान्य देतात त्याचप्रमाणे आता दुसऱ्या कोर्सेससाठी पंपन्या पुढे येत आहेत. देशात सध्या 23 आयआयटी संस्था आहेत. आगामी 2030 पर्यंत देशातील सर्वच उच्च शिक्षण संस्थेत वेगवेगळ्या स्ट्रीमचे कोर्सेस असतील. आयआयएम, आयआयटीत मेडिकल कोर्सेससुद्धा सुरू होऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

आयआयटी गुवाहाटीमध्ये दोन वर्षांच्या एमए प्रोग्रामसोबत डिपार्टमेंट ऑफ ह्युमॅनिटिज अँड सोशल सायन्सचे शिक्षण घेता येते. मॅनेजमेंटमध्ये पीएचडी होते. आयआयटी कानपूरमध्ये फुल टाईम एमबीए प्रोग्राममध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ह्युमॅनिटिज अँड सोशल सायन्समध्ये पीएचडी प्रोग्रामसुद्धा आहे.

आयआयटीत केवळ इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले जात असायचे, परंतु आता आयआयटीमध्ये 360 डिग्री बदल होताना दिसत असून विद्यार्थी आपल्या आवडीचे विषय निवडत आहेत. आयआयटी मद्रासमध्ये मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) मध्ये कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट स्कोरच्या आधारावरअ‍ॅडमिशन होते.

इनोव्हेशनमध्ये आयआयटी मुंबई अव्वल

2024 च्या इंडिया रँकिंगनुसार, मॅनेजमेंटमध्ये गुजरात राज्यातील आयआयएम अहमदाबाद नंबर वनवर आहे. टॉप 10 च्या यादीत आयआयएमची संख्या 7 आहे. आयआयटीतसुद्धा आता मॅनेजमेंटचे शिक्षण घेता येते. आयआयटी दिल्ली चौथ्या नंबरवर आहे, तर आयआयटी मुंबई 10 व्या नंबरवर आहे. रिसर्चमध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स बंगळुरू, आयआयटी मद्रास, आयआयटी दिल्ली बेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट आहेत. इनोव्हेशनमध्ये आयआयटी मुंबई अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी अनुक्रमे आयआयटी मद्रास आणि आयआयटी हैदराबाद आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;