भाजप आतून बाहेरून दाखवणार माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शीशमहाल, केजरीवाल यांची अडचण वाढण्याची शक्यता

भाजप आतून बाहेरून दाखवणार माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शीशमहाल, केजरीवाल यांची अडचण वाढण्याची शक्यता

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकारी निवास्थानाबद्दल भाजपने एक मोठी घोषणा केली आहे. हा बंगला पत्रकारांना आता आतून आणि बाहेरून दाखवला जाणार आहे. हा बंगला सिव्हिल लाईन्सच्या फ्लॅगस्टाफ मार्गावर आहे. या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी अरविंद केजरीवाल यांनी लाखो रुपये खर्च केले होते असा आरोप भाजपने केला होता. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने या मुद्द्यावर जोरदार प्रचार केला होता. इतकंच नाही तर केजरीवाल हे ‘आम आदमी’ नाही असा दावाही भाजपने केला होता.

दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपचे मंत्री प्रवेश वर्मा यांनी शीशमहलची टूर आयोजित केल्याची माहिती दिली. पत्रकारांना हा शीशमहल दाखवला जाईल, माजी मुख्यमंत्री करदात्यांचा पैसा कसा वापराचे हे आम्ही जनतेला दाखवू असे वर्मा म्हणाले. असे असले तरी ही टूर कधी होणार याची तारीख अद्याप कळालेली नाही. भाजपने या बंगल्याला शीशमहल असे नाव दिले होते. या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी ३३ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा भाजपने केला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;