महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य
महायुतीच्या काळात मागासवर्गीयांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित आहेत, असं सुद्धा रामदास आठवले म्हणाले आहेत. सांगलीत माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
काय म्हणाले रामदास आठवले?
भोरमधील हत्या प्रकरणावर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले की, ”आपलं सरकार असूनही दलितांना असुरक्षितता वाटते. या सरकारला आपण इतकं भरभरून मतदान केलं, हे सरकार असूनही दलितांची अशी अवस्था होत असेल तर, हे योग्य नाही. मला वाटतं की, यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाऊ नये.”
ते म्हणाले की, ”आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. दलितांना न्याय मिळणार आहे की, नाही? या सरकारमध्ये आम्ही आहोत, या सरकारमध्ये दलितांवर अन्याय होत असेल, तर ही गोष्ट बरोबर नाही.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List