तुम्हालाही कोरीयन ग्लास स्किन हवी आहे! मग किचनमधील रोजच्या आहारातील भात आहे खूप महत्त्वाचा

तुम्हालाही कोरीयन ग्लास स्किन हवी आहे! मग किचनमधील रोजच्या आहारातील भात आहे खूप महत्त्वाचा

सध्याच्या घडीला सौंदर्य जगतामध्ये कोरीयन ब्युटी ट्रिटमेंटला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोरीयन ब्युटी ट्रिटमेंट आता हिंदुस्थानातही फार मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यामध्ये कोरीयनसारखी ग्लास स्किनला मागणी आहे. महिलांसाठी किंवा मुलींसाठी नवीन आलेला ट्रेंड फाॅलो करण्याचा कल कायम असतो. असाच हा सध्याच्या घडीला कोरीयन ब्युटी ट्रेंड फाॅलो करण्याकडे महिलांचे लक्ष वेधलेले आहे.

कोरीयन ब्युटी ट्रेंडमधील काही गोष्टी आणि टिप्स या एकदम आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. या छोट्या टिप्स आपण घरी करुन पाहिल्या तरीही आपणही कोरीयन ग्लास स्किन घरबसल्या मिळवु शकतो. काहीही खर्च न करता केलेले उपाय हे कायमच महिला वर्गाच्या प्रथम पसंतीचे असतात. असेच घरगुती उपाय आपण बघुया. आपल्या आहारामध्ये रोज आपण भाताचा समावेश हमखास करतो. घरी रोज भात होत असल्याकारणाने, आता कोरीयन्स सारखी सुंदर त्वचा तुम्हीही अगदी घरबसल्या मिळवु शकता.

आपल्या चेहऱ्यावरील त्वचेला आवश्यक असणारी खनिजे, व्हिटॅमिन पुरवण्याचे काम हे भाताच्या मास्कमधून होत असते. भातामध्ये असलेली पोषक द्रव्ये ही खासकरुन चेहऱ्यावरील त्वचेसाठी पूरक आहेत. 

 

चेहऱ्यावर भाताचा मास्क लावल्यामुळे, मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील जळजळही थांबते.

 

भाताच्या मास्कमुळे चेहरा हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळेच त्वचा नाजूक आणि कोमल होण्यास मदत होते.

 

भाताची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यामुळे, त्वचा अधिक चमकदार होण्यास मदत होते.

 

भाताची पेस्ट चेहऱ्यासाठी थंडावा देण्याचा महत्त्वाचे कार्य करते. 

 

हा मास्क चेहऱ्यावर लावल्यामुळे सुरकुत्या येण्याचा संभव कमी होतो. तसेच त्वचेला येणारा लालसरपणा देखील कमी होतो.

 

भाताचा मास्क चेहऱ्यावर कसा लावाल?

साहित्य

अर्धा कप- शिजवलेला भात

दोन टी स्पून- दूध किंवा दही

छोटा चमचा- मध

बदाम तेल- ३ ते ४ चमचे

कृती

तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्यातून धुवून घ्यावा. त्यानंतर तो तांदूळ तसाच फ्रीजमध्ये ठेवावा. किमान दोन ते तीन दिवसानंतर, नेहमी आपण भात करतो त्याप्रमाणे भात करावा. 

 

हा भात करताना यामध्ये पाणी जास्त मात्रेमध्ये घालावे. म्हणजे हा भात अधिक शिजवून घ्यावा. 

 

भात पूर्णपणे थंड झाल्यावर, त्याची गरगरीत पेस्ट बनवा. त्यानंतर यामध्ये दूथ किंवा दही तुमच्या आवडीनुसार मिक्स करा.

 

त्यानंतर मध आणि बदाम तेल घालावे. 

 

सर्व मिश्रण नीट एकजीव करावे. या मिश्रणाचा लेप चेहऱ्यावर नीट लावावा. 

 

किमान पंधरा ते वीस मिनिटांनंतर, हा मास्क कोमट पाण्यानेच धुवावा. 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;