अनियमित पाळीने तुम्हीसुद्धा त्रस्त आहात! करुन बघा साधे सोपे घरगुती रामबाण उपाय..

अनियमित पाळीने तुम्हीसुद्धा त्रस्त आहात! करुन बघा साधे सोपे घरगुती रामबाण उपाय..

आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता ही तक्रार आता नवीन नाही. अनेक मुली आणि महिलांमध्ये पाळी पुढे मागे होण्याचे प्रमाण हे खूप आहे. खासकरून पाळी नियमित नसणे ही अनेकींची तक्रार आहे. अशावेळी आपण पाळी नियमित करण्यासाठी गोळ्यांचा भडीमार शरीरावर करतो. त्यामुळे काही प्रमाणात पाळी नियमित होते, परंतु पुन्हा जैसे थै! अशावेळी आपण घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास आपली पाळी नियमित होण्यास नक्कीच मदत होईल. 

कधी कधी काही महिन्यांपर्यंत पाळी न येणं तर कधी २१ दिवसांच्या अगोदरच रक्तस्राव सुरू होणं, अशा प्रकारच्या तक्रारी तर आता नेहमी ऐकायला मिळतात. या सगळ्या तक्रारी निर्माण होतात त्या हार्मोन्समध्ये झालेल्या बदलांमुळे.

 

रात्रभर सफेद तीळ पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर हे पाणी दिवसातून दोन वेळा प्या.

 

जिऱ्याचं पाणी पिल्यानं मासिक पाळी नियंत्रणात राहते… सोबतच त्यामुळे होणाऱ्या पोटदुखी, कंबरदुखी यासारख्या त्रासांपासूनही आराम मिळतो.

 

जिऱ्यांमध्ये असलेल्या लोहामुळे महिलांना मासिकपाळी दरम्यान होणारा त्रास कमी होतो. यासाठी एक चमचा जिऱ्यात एक चमचा मध मिसळून त्याचं दररोज सेवन करा.

 

कच्ची पपई खाल्लानं तुमच्या मासिक पाळी संदर्भात अनेक तक्रारी दूर होतील. यामध्ये भरपूर पोषण, अॅन्टीऑक्सिडंट असतात.

 

जास्वंदाचं फुल शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजिस्ट्रॉनला बॅलन्स करून मासिक पाळी नियमित करण्यास मदत करतं.

 

तुळशीच्या पानांच्या रसात एक चमचा मध मिसळून घ्या. यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होईल. दररोज द्राक्षांचा रस पिल्यानं तुम्हाला अनियमीत मासिक पाळीपासून सुटका मिळेल.

 

धने किंवा बडीशेपच्या दाण्यांचा काढा दिवसातून एकदा घ्या. धने किंवा बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या, यामुळेही तुमचा त्रास दूर होईल. 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;