फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी एकनाथ शिंदे व अजित पवार गटाला मतदान केलंय – सुरेश धस

फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी एकनाथ शिंदे व अजित पवार गटाला मतदान केलंय – सुरेश धस

महायुतीत सध्या वर्चस्वावरून धुसफूस सुरू आहे. आधीच महायुतीतीतल वातावरण तापलेले असताना भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ”राज्यातील जनतेने देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) चेहऱ्याकडे बघून मिंधे व अजित पवार गटाला मतदान केल्याचे ते म्हणाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता महायुतीत वादाची आणखी एक ठिणगी पडली आहे.

”देवेंद्र फडणवीस एक इमानदार चेहरा आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र दिला पाहिजे या भावनेतून जनतेने आमच्यासोबत घड्याळलाही (अजित पवार गट)  आणि बाणालाही (मिंधे गट) मतदान केलं. आमची लोकं घड्याळाला मतदान करू शकतात का? तरिही दिलं. घड्याळही हाणलं आणि बाणही हाणला, असं सुरेश धस म्हणाले. धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;