भूक लागत नाहीये दिवसातून ‘हा’ पदार्थ नक्की खा… पचनशक्ती सुद्धा सुधारेल

भूक लागत नाहीये दिवसातून ‘हा’ पदार्थ नक्की खा… पचनशक्ती सुद्धा सुधारेल

उन्हाळ्यात आपल्याला भूक न लागण्याच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं. अशावेळी आपल्या घरातील खजूर हा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. खजूर म्हणजे उत्तम उर्जेचा स्त्रोत. यामध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर खजूरमध्ये मुबलक प्रमाणात असतात. कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खजूर किंवा खारीक खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. 

चांगल्या आरोग्यासाठी गोड फळेही तितकीच महत्वाची आहेत. सुका मेव्यातील खजूर हे खूप चांगले. खजूर किंवा खारीक खाल्ल्याने त्याचे खूप फायदे आहेत.

 

चांगल्या आरोग्यासाठी आणि सुदृढ शरीरयष्टीसाठी खारीक अत्यंत उपयुक्त आहे. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते.

खारीक नियमित खाल्ल्यास दमा असणाऱ्या रुग्णांना आराम मिळेल. अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होतो.

 

खारकेचे सेवन करणे हे खूपच पौष्टिक मानले जाते. जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते.

 

खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत खजूरामध्ये असल्यामुळे, खजूर खाल्ल्यावर उर्जावान वाटते. कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे हाडांची चांगली वाढ होते.

 

खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्‍ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्‍त असते.

dates

खजूर खाल्ल्याने त्वचा चांगली राहते. खारीकमध्ये व्हिटॅमिन सी, डी असतात. त्यामुळे आपल्या शरीरासाठी हे घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. 

 

आहारात खारकांचा समावेश असेल तर, त्वचेची समस्या जाणवत नाही. अकाली वृ्द्धत्व कमी होते.

 

खजूर किंवा खारीक खाल्ल्याने आपली पचनशक्ती सुद्धा सुधारते. रात्री खारीक भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खावी म्हणजे ते आरोग्यासाठी अतिशय उत्तम.

 

भूक वाढवण्यासाठी खारीक पावडर उकळलेल्या दुधामध्ये टाकून गार करून दूध प्यावे. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते.

(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;