‘बॉम्बची भीती’: दोन लढाऊ विमानांच्या मदतीने न्यूयॉर्क-दिल्ली विमान रोमला वळवले

‘बॉम्बची भीती’: दोन लढाऊ विमानांच्या मदतीने न्यूयॉर्क-दिल्ली विमान रोमला वळवले

 

एएफपी वृत्तसंस्थेने विमानतळ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणारे अमेरिकन एअरलाइन्सचे विमान ‘बॉम्बच्या भीतीमुळे’ रोमला वळवण्यात आले, असे वृत्त दिले आहे.

अमेरिकन एअरलाइन्सचे AA292 हे विमान 22 फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्कच्या जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीच्या दिशेने प्रवास करत होते. मात्र ते रोमला वळवण्यात आले. या विमानात 199 प्रवाशांसह विमानातील क्रू होते. बॉम्बेची धमकी मिळताच हे बोईंग विमान रोमच्या दिशेने वळवून फ्युमिसिनो विमानतळावर उतरले.

इटलीच्या एएनएसए वृत्तसंस्थेने अशी माहिती दिली आहे की, ‘बॉम्बच्या धमकीमुळे’ विमानाचा मार्ग ऐनवेळी बदलण्यात आला.

विमानतळ अधिकाऱ्यांनी एबीसी न्यूजला सांगितले की, विमान लिओनार्डो दा विंची रोम फ्युमिसिनो विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आहे.

‘सुरक्षेला आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आम्ही आमच्या प्रवाशांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानतो’, असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.

एएफपीच्या वृत्तानुसार, धोक्याची सूचना मिळताच प्रोटोकॉलनुसार या प्रवासी विमानाला दोन लढाऊ विमानांनी इटालियन विमानतळावर नेले. विमानतळावर सर्व प्रवाशांना विमानातून सुखरुप उतरवण्यात आणि हवी ती मदत देण्यात आली.

दरम्यान, या घटनेचा विमानतळाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही. ‘कर्मचाऱ्यांनी सुरक्षेसंदर्भात तक्रार केल्यानंतर’ यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने विमान सुरक्षितपणे उतरल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;