‘बाथरूममध्ये जाऊन चार तास…’ पत्नी सोनियाने सांगितलं हिमेश रेशमियाचं ते सिक्रेट, अभिनेत्याची झाली चांगलीच पंचाईत

‘बाथरूममध्ये जाऊन चार तास…’ पत्नी सोनियाने सांगितलं हिमेश रेशमियाचं ते सिक्रेट, अभिनेत्याची झाली चांगलीच पंचाईत

प्रसिद्ध गायक आणि अभिनेता हिमेश रेशमिया सध्या त्याचा चित्रपट ‘बैडऐस रविकुमार’मुळे चांगलाच चर्चेमध्ये आहे. त्याने नुकतीच आपली पत्नी सोनिया कपूरसोबत ‘द सोनिया कपूर शो’ नावाच्या पॉडकास्टची सुरुवात केली आहे. या पॉडकास्टमध्ये हिमेश रेशमिया याने आपला चित्रपट ‘बैडऐस रविकुमार’वर चर्चा केली. याचदरम्यान त्याची पत्नी सोनिया कपूरने आपल्या पतीच्या एका सवयीबाबत मोठा खुलासा केला.तीने म्हटलं की हिमेश रेशमिया तयार होण्यासाठी तासंतास वेळ लावतात. त्यांना तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो. कारण ते बाथरूमध्ये ठेवलेल्या आरशात स्वत:ला बराचवेळ न्याहळत राहतात.

या पॉडकास्टमध्ये पत्नी सोनियाने आपल्या पतीचं कौतुक देखील केलं आहे, तीने म्हटलं आहे जसंजसं माझ्या पतीचं वय वाढत आहे, तसा -तसा तो अधिक तरुण दिसू लागला आहे. त्यानंतर सोनियाने हिमेशला एक प्रश्न विचारला, तुला तुझ्यात सगळ्यात जास्त काय आवडतं. त्याचसोबत तीने आपल्या पतीची चांगलीच पोलखोल देखील केली आहे. बाथरूममध्ये चार तास स्वत:ला न्याहाळत राहातो असं तीने म्हटलं आहे. पत्नीच्या या गोष्टी ऐकून हिमेशला देखील धक्का बसला, यावर उत्तर देताना तो म्हणाला की हे तू काय बोलते आहेस? तुला टीआरपी हवा आहे, आणि तो तू माझ्या नावावर मिळवत आहेस.

त्यानंतर बोलताना सोनिया कपूरने म्हटलं आहे की मी खर सांगतीये, तू असाच आहेस. जर तुला सकाळी नऊ वाजताची फ्लाइट पकडायची असेल तर तू पहाटे तीन वाजता उठतोस. तयार होण्यासाठी एवढा वेळ कोण घेत. त्यावर उत्तर देताना स्वत:च्या बचावावर हिमेश रेशमियाने म्हटलं की मला तेवढा वेळ लागत नाही, मात्र मी माझं प्रत्येक काम परेफेक्टली करतो. त्यावर सोनियाने हसत हसत म्हटलं की तुझं बरोबर आहे कारण तुला आरशात पाहाण्यासाठी दोन तासांचा वेळ हवा असतो. त्यावर हिमेश रेशमियाने म्हटलं की हे तू काय बोलते आहेत? त्यावर ती म्हटली मला आज माफ कर पण मी तुझी पोल खोलत आहेत. सोनिया कपूर आणि हिमेश रेशमिया यांनी 2018 मध्ये लग्न केलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;