कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळताच माणिकराव कोकाटेंवर कारवाई, राहुल नार्वेकर यांनी स्पष्टपणे सांगितले

कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळताच माणिकराव कोकाटेंवर कारवाई, राहुल नार्वेकर यांनी स्पष्टपणे सांगितले

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळताच माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होईल, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकमधील कोर्टाने 1995च्या एका प्रकरणात दोन वर्षांची पैद आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीनुसार माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होऊ शकते. काँग्रेस नेते राहुल गांधी  आणि आमदार सुनील केदार यांना शिक्षा ठोठावल्यानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची आमदारकी रद्द झाली होती. पण माणिकराव कोकाटे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.  त्यामुळे याच न्यायाने माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे कारवाईबाबत विचारले असता ते म्हणाले की, न्यायालयाने त्यांना ठोठावलेल्या शिक्षेची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त होताच अपात्रतेच्या संदर्भात कारवाई केली जाईल. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत माणिकराव कोकाटेंच्या विरोधात कारवाई होईल असे दिसून येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;