पोप फ्रान्सिस यांची प्रकृती गंभीर; व्हॅटिकनची माहिती

पोप फ्रान्सिस यांची प्रकृती गंभीर; व्हॅटिकनची माहिती

पोप फ्रान्सिस यांची प्रकृती गंभीर असल्याचे व्हॅटिकनने शनिवारी सांगितले. 88 वर्षीय पोप याना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याची आणि रक्त संक्रमणाची गरज होती. त्यांच्यावर उपचार सुरू असून अजूनही त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे व्हॉटिकनने म्हटले आहे.

पोप फ्रन्सिस यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्यांच्यावरील धोका अद्याप टळला नसल्याचे व्हॅटिकनने त्यांच्या संध्याकाळच्या पोप यांच्या प्रकृतीबाबतच्या अपडेटमध्ये म्हटले आहे. सकाळी पोप फ्रान्सिस यांना दीर्घकाळ दम्याचा आणि श्वसनाचा त्रास होता. त्यासाठी त्यांना कृत्रीम ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. त्यांच्या रक्त चाचण्यांमध्ये अ‍ॅनिमियाशी संबंधित थ्रोम्बोसाइटोपेनिया दिसून आला आहे.

पोप फ्रान्सिस यांना 14 फेब्रुवारी रोजी ब्राँकायटिसमुळे रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाचा प्रादुर्भाव दिसत असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;