‘रॉकस्टार’मधील अभिनेत्री नरगिस फाखरीने गुपचूप उरकले लग्न, कोण आहे पती?

‘रॉकस्टार’मधील अभिनेत्री नरगिस फाखरीने गुपचूप उरकले लग्न, कोण आहे पती?

‘रॉकस्टार’ या चित्रपटातून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे नरगिस फाखरी. आता नरगिस तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. असे म्हटले जात आहे की नरगिसने गुपचूप लग्न केले आहे. तिच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण नगसिने कोणाशी लग्न केले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया तिच्या नवऱ्याविषयी…

ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री नरगिस फाखरीने लॉस एंजेलिसमध्ये लग्न केले आहे. हे लग्न अतिशय खासगी पद्धतीने पार पडले आहे. तिच्या लग्नाला केवळ जवळचे मित्र-मैत्रिणी आणि काही मोजक्याच कुटुंबीयांना आमंत्रण देण्यात आले होते. या मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये नरगिसने टोनीशी लग्न केले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लग्नानंतर नरगिस आणि टोनी हे हनिमूनसाठी स्विझरलँडला गेले आहेत. दोघे २०२२ पासून एकमेकांना डेट करत आहेत. जवळपास तीन वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Nargis Fakhri is married to her bf Tony Beig
byu/ExtraStudy1399 inBollyBlindsNGossip

कोण आहे नरगिसचा पती?

टोनीचा जन्म कश्मीरमध्ये झाला आहे. पण तो लॉस एंजेलिसमध्ये रहातो. पेशाने तो एक व्यावसायिक आहे. तो क्लोदिंग मर्चंडाइन कंपनी ‘द डियोज ग्रूप’चा फाऊंडर आहे. त्याने २००६मध्ये ही कंपनी सुरु केली होती. आज तो एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखला जातो. आता त्याने नरगिसशी लग्न केल्यामुळे तो चर्चेत आला आहे.

नरगिस फाकरी विषयी

नरगिस ही बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. २०११मध्ये दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या ‘रॉकस्टार’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर दिसला होता. दोघांची जोडी त्यावेळी विशेष चर्चेत आली होती. आता सोशल मीडियावर नरगिसच्या लग्नातील ठिकाणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच तेथे ठेवण्यात आलेल्या केकवर नरगिस आणि टोनी असे नाव लिहिण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;