प्राजक्ता माळी अन् मृण्मयी देशपांडेचा नऊवारी नेसून ‘बुम बुम’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
प्राजक्ता माळी आजकाल अनेक गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असते. ती नेहमी तिच्या चाहत्यांना वेगवेगळ्या माध्यमातून सरप्राईज देत असते. तसेच तिच्या करिअरचे किंवा तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दलचे अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. फुलवंतीमधील तिच्या अभिनयाचे आजही कौतुक होतं. फुलवंतीमधून तिने तिच्या अभिनयाची एक वेगळीच झलक प्रेकांना दाखवली. त्यानंतर आता ती प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येणार याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते.
प्राजक्ता ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला
प्रेक्षकांची ही प्रतिक्षा आता संपणार असून प्राजक्ता लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि तेही अगदी हटके लूकमध्ये आणि वेगळ्या ढंगात. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात प्राजक्ता माळी एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान या चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. सध्या या चित्रपटातील एक गाणं खूप चर्चेत आहे. याच गाण्यावर प्राजक्ता माळी आणि मृण्मयी देशपांडेने जबरदस्त डान्स केला आहे.
प्राजक्ता माळी आणि मृण्मयी देशपांडेचा नऊवारी घालून जबरदस्त डान्स
अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि मृण्मयी देशपांडेचा हा जबरदस्त डान्स व्हिडीओ प्राजक्ताच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता आणि मृण्मयीने छान नऊवारी घालून डान्स केलेला पाहायला मिळत आहे. प्राजक्ताने गुलाबी रंगाची नऊवारी नेसली आहे तर मृण्मयीने केशरी रंगाची नऊवारी नेसली आहे. दोघी मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.
‘बुम बुम बोंबला’ केलेला डान्स व्हायरल
या व्हिडीओमध्ये प्राजक्ता व मृण्मयी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटातील ‘बुम बुम बोंबला’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यातील हुकस्टेप त्यांनी केली आहे. प्राजक्ता व मृण्मयीचा हा डान्स व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. प्राजक्ता माळी व मृण्मयी देशपांडेच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘चिकी चिकी बुबूम बुम’ मध्ये हास्यजत्रेतील कलाकार एकत्र
28 फेब्रुवारीला ‘चिकी चिकी बुबूम बुम’चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेत्री नम्रता संभेरावचा कॅमिओ आहे. या कॅमिओबद्दल नम्रता म्हणाली होती, ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात माझा छोटा कॅमिओ आहे. अवघ्या चार वाक्यांची भूमिका आहे. ही छोटी भूमिका खूप मोठा परिणाम करते. तर आता मी वेगळं काम केलं आहे, जे चार वाक्यात संपणार आहे. पण अत्यंत महत्त्वाचं काम केलंय. प्रसादचे मला मनापासून आभार मानायचे आहेत.” असं म्हणत तिने आभार व्यक्त केले. दरम्यान या चित्रपटाच्या निमित्ताने हास्य जत्रेतील काही कलाकार मंडळी पुन्हा एका चित्रपटात धम्माल करताना दिसणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Shubham (@prajaktamalifanclub_)
Comment List