सुनेला जेवणावरून टोमणे मारणे छळच; मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निर्णय

सुनेला जेवणावरून टोमणे मारणे छळच; मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निर्णय

लग्नानंतर महिनाभरातच विवाहितेला माहेरहून पैसे आणण्यासाठी छळणार्‍या पती व त्याच्या आई-वडिलांना मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने मोठा दणका दिला. सासरच्या छळाला त्रस्त झालेल्या महिलेला तिच्या भावाने वाचवले आणि माहेरी आणले. त्यानंतर महिलेने अंतरिम पोटगी मागत दंडाधिकारी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने तिचा कौटुंबिक छळ झाल्याच्या युक्तिवादाचा स्विकार केला. सासूबाई सुनेला वारंवार जेवण बनवण्यावरुन टोमणे मारायची. जेवण नीट जमत नाही असे बोलत तिला किचनमध्ये पाठवले जात नव्हते. हा सगळा प्रकार कौटुंबिक छळ आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.

चेंबूर येथील महिलेने पती व सासू सासर्‍याविरुद्ध दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती. कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत अंतरिम पोटगीचा दावा केला होता. पती व सासरच्या लोकांनी अर्जदार महिलेला माहेरहून 20 लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. अर्जदार महिलेचे सगळे दागिने सासूने स्वतःच्या ताब्यात ठेवले होते.

महिला फक्त दहावी शिकली. तिच्या कमी शिक्षणावरुन तसेच जेवण बनवता येत नसल्याच्या कारणावरून तिला त्रास दिला जात होता. पती महिलेला पनवती असल्याचे हिणवत होता, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. त्यावरून विवाहित महिलेचा कौटुंबिक हिंसाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने अर्जदार महिलेला 7 हजार रूपयांची अंतरिम पोटगी मंजूर केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;