घटस्फोटानंतर युझवेंद्र चहलने धनश्रीला किती दिली पोटगी? मिळालेल्या रक्कमेत निघेल संपूर्ण आयुष्य
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटानंतर सर्वजण चकीत झाले. त्यापाठोपाठ आता युझवेंद्र चहल आणि धनश्री यांचा देखील घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर धनश्रीला पोटगी म्हणून किती रक्कम मिळाली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी...
धनश्री आणि युझवेंद्र चहल यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. काल, २० फेब्रुवारी रोजी दोघांचा अधिकृतरित्या घटस्फोट झाला आहे. त्यानंतर दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, धनश्रीला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे. ही रक्कम जवळपास ६० कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. पण याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List