फक्त 2 मिनिटांसाठी जाऊ शकता…, कंपनीने लागू केला टॉयलेट रूल;कर्मचाऱ्यांच्या रोषानंतर निर्णय मागे

फक्त 2 मिनिटांसाठी जाऊ शकता…, कंपनीने लागू केला टॉयलेट रूल;कर्मचाऱ्यांच्या रोषानंतर निर्णय मागे

दक्षिण चीनमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेसाठी शौचालयाचा वापरण्याचा नियम बनवला आहे. कंपनीने प्राचीन काळाचा दाखला देत हा टॉयलेट रूल तयार केला आहे. शौचालयाचा वापर करण्यासा कर्मचाऱ्यांना फक्त 2 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. जर कर्मचारी वारंवार तिथे गेला तर 1200 रुपये दंड आकारला जाईल. तसेच पगार कपातही करण्यात येईल. कंपनीच्या या नियमांबद्दल कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या तसेच या रुलचे वृत्त पसरताच कंपनीला नियम मागे घ्यावा लागला आहे.

कंपनीचा असा युक्तिवाद आहे की हे धोरण प्राचीन चिनी वैद्यकीय शास्त्राशी सुसंगत आहे. या निमाचा उद्देश सुव्यवस्था राखणे, कार्यक्षमता वाढवणे आणि कामाच्या ठिकाणाचा दृष्टिकोन सुधारणे असल्याचे कंपनीने सांगितले. या निमानुसार कर्मचाऱ्यांना सकाळी 8 वाजण्यापूर्वी, सकाळी 10.30 ते 10.40, दुपारी 12 ते 1.30, दुपारी 3.30 ते 3.40 आणि संध्याकाळी 5.30 ते 6 वाजेपर्यंत शौचालय वापरण्याची परवानगी आहे. ओव्हरटाईम शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्री 9 नंतर परवानगी देण्यात आली आहे.

या वेळेव्यतिरीक्त कामगारांना गरज असल्यास ते शौचालयात जाऊ शकतात. मात्र, त्यांना फक्त दोन मिनिटांपर्यंत वेळ मिळेल. कंपनीने सकाळी आणि दुपारी काही विशिष्ट वेळी शौचालय वापरण्यावर कडक निर्बंध लादले आहेत. त्यात ओव्हरटाइम शिफ्टचाही समावेश आहे. ज्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट शारीरिक समस्यांमुळे वारंवार शौचालयात जावे लागते ते यासाठी परवानगी घेऊ शकतात. तथापि, या कालावधीत घालवलेल्या वेळेसाठी त्याचा पगार कापला जाईल. या नियमावर सर्व स्तरांतून टीका झाली आहे.

हा नियम कामगारांच्या आरोग्याला धोका निर्माण करून कामगार कायद्यांचे उल्लंघन करतो. कायद्यानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन, कामाचे तास, विश्रांतीचा कालावधी, सुट्ट्या किंवा सुरक्षा प्रोटोकॉलमधील कोणतेही बदल सर्व कर्मचाऱ्यांच्या किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चर्चा करून परस्पर सहमती सुनिश्चित करावी, असे तम वकिलांनी व्यक्त केले. या निर्णयामुळे वाद वाढत असल्याने कंपनीने अखेर हा निर्णय मागे घेतला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;