डास मारा, पैसे कमवा, डेंग्यूमुक्तीसाठी या देशाची अनोखी मोहीम

डास मारा, पैसे कमवा, डेंग्यूमुक्तीसाठी या देशाची अनोखी मोहीम

मच्छरांमुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार होतात. तसेच साथीचे रोगाचा फैलाव जोमाने होतो. उष्ण आणि समशीतोषण कटीबंधात मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. मच्छरांपासून होणारे रोग रोखण्यासाठी डासनिर्मूलनासाठी सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येतात. तसेच जनजागृतीही करण्यात येते. मात्र, एका आशियाई देशात डास मारा, पैसे कमवा,अशी अनोखी मोहीम डास निर्मूलनासाठी राबवली जात आहे.

फिलीपिन्स देशात मनिला येथेअशी अनोखी मोहीम राबवली जात आहे. डासांपासून होणारे रोग आणि मच्छरांची पैदास कमी करण्यासाठी जनतेच्या प्रत्यक्ष सहभागीसाठी अशा मोहीम राबवण्यात येत आहे. येथे ठराविक परिसरातील नागरिक रांगेत उभए राहतात आणि मारलेल्या मचछरांचा पुराव देत पैसे कमवत आहेत.

जनतेची साथीचे राग आणि मच्छरांपासून होणाऱ्या रोगांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली. त्याला जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळत असून मच्छरांची संख्या कमी झाली असून रोगांचा प्रादुर्भावही कमी होत असल्याचे सांगण्यात आले. फिलीपिन्सचे आरोग्य अधिकारी आणि तज्ज्ञ या मोहिमेच्या यशाबाबत साशंक होते. मात्र, योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

काहीजण मुद्दाम डासांची पैदास करतील आणि त्यांना मारून पैसे कमावतील, अशी शक्यताही वर्तवण्यात आली. मात्र, ते वाटते तवेढे सोपे नाही. मच्छरांची पैदास करून त्यांना पकडणे खूप कठीण आहे. तसेच डासांपासून होणाऱ्या रोगांना दूर करण्य़ासाठी जनता यात सहभागी होत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने 2023 मध्ये पश्चिम पॅसिफिक प्रदेशात फिलीपिन्सला डेंग्यूने सर्वाधिक प्रभावित देश म्हणून स्थान दिले होते, तेव्हा तेथे 167,355 रुग्ण आढळले होते आणि त्यात 575 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही मोहीम राबवण्यात आली असून त्याचा चांगला परिमाम दिसत आहे. अनेकांना याचा आर्थिक फायदाही झाला असून ते या पैशांचा योग्य वापर करत आहेत. तर काहीजणांनी मच्छरांपासून होणारे आझार अनुभवले असल्याने ते स्वतःहून या मोहिमेत सहभाग घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;