‘छावा’ सिनेमा मराठीत प्रदर्शित होणार, मंत्री उदय सामंत यांची पोस्ट व्हायरल

‘छावा’ सिनेमा मराठीत प्रदर्शित होणार, मंत्री उदय सामंत यांची पोस्ट व्हायरल

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमाने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं आहे. सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते होते. अखेर 14 फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित झाला आणि चित्रपटगृह हाऊस फुल झाली. सिनेमाच्या कमाई दिवसागणिक वाढ होत असताना. सिनेमा मराठीतून देखील प्रदर्शित व्हावा… अशी मागणी प्रेक्षकांकडून होताना दिसली. आता मंत्री उदय सामंत यांनी दिग्दर्शकांची भेट घेऊन सिनेमा मराठी भाषेत प्रदर्शित होईल असे संकेत दिले आहेत.

मंत्री उदय सामंत यांनी दिग्दर्शत लक्ष्मण उतेकर आणि अमेय खोपकर यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत त्यांनी सिनेमा मराठीतून देखील प्रदर्शित करण्याची विनंती केली आहे. एक्सवर फोटो पोस्ट करत उदय सामंत म्हणाले, ‘आज “छावा” चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. ” छावा ” चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणून विनंती केली. ती त्यांनी मान्य केली.सोबत अमेय खोपकर उपस्थित होते…’ सध्या त्यांचं ट्विट व्हायरल होत आहे.

 

 

सांगायचं झालं तर, अभिनेता संतोष जुवेकर याने लाइव्ह सेशल केलं. तेव्हा अभिनेत्याला सुद्धा मराठीत सिनेमा प्रदर्शित होणार का? याबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. सिनेमात संतोष याने रायाजी यांच्या भूमिकेला न्याय दिलं आहे. ज्यामुळे अभिनेत्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने आतापर्यंत 171.28 कोटींचा गल्ला जमा केला आहे. तर जगभरात सिनेमाने 200 कोटींच्यावर मजल मारली आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ‘छावा’ सिनेमाचे शो हाऊसफुल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात सिनेमा किती कोटींच्या घरात पोहोचेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सिनेमातील कलाकार

‘छावा’ सिनेमात विकी कौशलशिवाय रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंग, दिव्या दत्ता, डायना पेंटी, नील भूपालम आणि प्रदीप रावत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;