Chhaava : आता ‘छावा’साठी मनोज जरांगे मैदानात, सरकारकडे सर्वात मोठी मागणी काय?

Chhaava : आता ‘छावा’साठी मनोज जरांगे मैदानात, सरकारकडे सर्वात मोठी मागणी काय?

गेल्या आठवड्यात सर्वत प्रदर्शित झालेला, विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ सिनेमा हा सध्या बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घालत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून यामध्ये विकी कौशल याच्या व्यतिरिक्त रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमासाठी विकी कौशलने प्रचंड मेहनत घेतली. तलवारबाजी, घोडेस्वारी, शिकत अथक महेनत करत त्याने या चित्रटासाठी तयारी केली.

14 फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात कौतुक होत असून विकी कौशल याने साकारलेली छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या मनात वसली आहे. या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून अवघ्या 5 दिवसात या चित्रपटाने भरपूर गल्ला जमवला आहे. जवळपास 130 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या ‘छावा‘ सिनेमाने देशात 165.00 कोटींची कमाई केली आहे.

छावा चित्रपट टॅक्स फ्री करा, मनोज जरांगे पाटील यांची मागणी

याच दरम्यान मराठा आदोंलक मनोज जरांगे पाटील हे ‘छावा’साठी मैदानात उतरले आहे. ‘छावा’ हा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती असून धाराशिव जिल्ह्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. धाराशिव मधील कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत. भगवा ध्वज फडकावत शिवजयंती उत्सवाची जरांगे पाटील यांनी सुरुवात केली. याचवेळी त्यांनी ‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री करावा ही मागणी केली.

तसेच राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. राहुल सोलापूरकर यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर सरकारच्या आदेशनानंतरच सोलापूरकर यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. तसेच द्वेषाने भरलेली टोळी असल्याची टीकाही जरांगे यांनी केली.

जगभरात ‘छावा’चं कलेक्शन किती ?

जगभरातील ‘छावा’ सिनेमाच्या कलेक्शन बद्दल बोलायचं या सिनेमाने जगभरात एकूण 230 कोटींची कमाई केल्याचे वृत्त आहे. चौथ्या दिवसाअखेरीस हे आकडे 195.60 कोटींच्या आसपास होते, असे समजते. येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटींची कमाई करेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;