सेलिब्रिटींच्या वीज बिलाचा आकडा पाहून तुम्हीही व्हाल थक्क! त्या रकमेत सर्वसामान्यांचं येईल हक्काचं घर
मुंबईतील वांद्रे इथं अभिनेता शाहरुख खानचा 'मन्नत' हा बंगला आहे. या आलिशात बंगल्यात अनेक खोल्या आणि अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत. या बंगल्यासाठी शाहरुख दर महिन्याला तब्बल 43 ते 45 लाख रुपये वीज बिल भरतो.
'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता विकी कौशल हा मुंबईत त्याची पत्नी-अभिनेत्री कतरिना कैफसोबत चार खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहतो. हे जोडपं दर महिन्याला 8 ते 10 लाख रुपये वीज बिल भरत असल्याचं कळतंय.
वांद्रे परिसरातच अभिनेता सलमान खानचं 'गॅलेक्सी' अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये तो त्याच्या आईवडिलांसोबत राहतो. सलमान दर महिन्याला 23 ते 25 लाख रुपयांचं वीज बिल भरतो.
बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा जुहूमध्ये 'जलसा' हा बंगला आहे. ते दर महिन्याला 22 ते 25 लाख रुपये वीज बिल भरतात.
अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे मुंबई चार खोल्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यासाठी ते दर महिन्याला 13 ते 15 लाख रुपये वीज बिल भरत असल्याचं समजतंय. या दोघांसोबत आता त्यांची चिमुकली दुआसुद्धा राहते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List