जेवणानंतर बडीशेप खाण्याचे आहेत खूप सारे फायदे… तुम्हीसुद्धा आजपासून खायला सुरुवात करा

जेवणानंतर बडीशेप खाण्याचे आहेत खूप सारे फायदे… तुम्हीसुद्धा आजपासून खायला सुरुवात करा

आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये बडीशेपची एक डबी ही कायम पाहायला मिळते. आत्तापर्यंत आपण जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने बडीशेप ही खाल्ली असेल. तोंडाची चव वाढविण्यासाठी बडीशेप हा एक उत्तम उपाय आहे. तोंडाची चव तसेच खाल्लेले अन्न पचनासाठी सुद्धा बडीशेप गरजेची आहे. इतकेच नव्हे तर, बडीशेपमध्ये मुबलक प्रमाणात लॅक्टोजेनिक गुणधर्म असतात. नवमातांसाठी दूध येण्यासाठी बडीशेप खाणे खूपच गरजेचे आहे. जेवणानंतर बडीशेप खाण्याचे असे काय फायदे आपल्या आरोग्यास होतात हे आपण बघूया.

हृद्यरोगावर रामबाण उपाय

हृद्यरोगासाठी बडीशेप खाणे अतिशय उत्तम मानले जाते. बडीशेपमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम आढळते. तसेच बडीशेपमध्ये कमी कोलेस्ट्राॅल आढळते त्यामुळे हृद्याच्या आरोग्यासाठी हे उत्तम असते. 

पचन सुधारण्यासाठी

आपले पचन सुधारण्यासाठी बडीशेप ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बडीशेप मध्ये असलेल्या गुणधर्मामुळे, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. बडीशेपमुळे आपल्या शरीरात पाचक रस वाढण्यास मदत होते, त्यामुळे आपले पचनही सुधारते. 

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी बडीशेप मोलाची भूमिका बजावते. बडीशेपमध्ये अँटिऑक्सिडंट असल्याकारणाने, चयापचय वाढते. तसेच यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासही मदत होते. 

त्वचेसाठी उत्तम

बडीशेप ही त्वचेसाठी सुद्धा वरदान मानली जाते. बडीशेपमध्ये झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियमचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळेच आपली त्वचा थंड राहण्यास मदत होते. तसेच बडीशेप खाण्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत होते. 

रक्तशुद्धी

बडीशेप रक्तशुद्धीसाठी सुद्धा प्रचंड गुणकारी आहे. यामुळे विविध आजारांवर मात करता येते. 

मुखशुद्धी

बडीशेपमुळे श्वासातील दुर्गंधी कमी होते, त्याचबरोबर प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. 

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;