30 हजारांत अमर होण्याचे किट, अमेरिकन अब्जाधीश देतोय चिरतरुण राहण्याचा मंत्र

30 हजारांत अमर होण्याचे किट, अमेरिकन अब्जाधीश देतोय चिरतरुण राहण्याचा मंत्र

वाढतं वय किंवा मृत्यूला कुणी टाळू शकत नाही. अमेरिकन अब्जाधीश ब्रायन जॉनसन यांनी मात्र वाढत्या वयाला आणि मृत्यूला आव्हान द्यायचं ठरवलंय. त्यासाठी ब्रायन जॉनसन आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करताहेत. आपली बेसुमार संपत्ती केवळ याचसाठी खर्च करत आहेत.

अमर होण्याचा मंत्र सांगणार्‍या ब्रायन जॉनसनने आपला अनुभव दुसर्‍यांसोबत शेअर करण्यासाठी आणि त्यांनाही दीर्घ आयुष्य लाभावे, म्हणून ब्रायन जॉनसनने एक परिषद घेतली. त्याचे नाव ‘डोंट डाय समिट’ असे ठेवले. वाढत्या वयाला कसे रोखायचे, याबाबतची माहिती त्यांनी समिटमध्ये दिली. त्यासाठी त्याने ३४९ डॉलर म्हणजे ३०३४२ रुपये एवढे तिकीट ठेवले. यावेळी खास जेवण ठेवण्यात आले. जेवणामध्ये एडोबो स्टीक, कीनोवा आणि भाज्यांचा समावेश होता. वेगवेगळ्या पावडरचे मिश्रणही टाकले. एवढेच नव्हे स्नेक ऑईल सारख्या वेगवेगळ्या तेलांचाही समावेश करण्यात आला होता. सहभागी लोकांची रक्ततपासणीही करण्यात आली.

ब्रायन जॉनसन दरवर्षी १ कोटी ७४ लाख रुपये याच कामासाठी खर्च करतात. त्यांचा दिनक्रम शिस्तबद्ध असतो. पहाटे साडेचार वाजता उठून फक्त पुढील चार तासांत दिवसभराचे भोजन करतात. सकाळी ९ वाजता ब्रायनचे दिवसभराचे शेवटचे खाणे असते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;