Nanded News – 10 फेब्रुवारी रोजी झालेला गोळीबार, आरोपीला मदत करणार्‍या एकास पंजाबमधून अटक; 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Nanded News – 10 फेब्रुवारी रोजी झालेला गोळीबार, आरोपीला मदत करणार्‍या एकास पंजाबमधून अटक; 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नांदेडच्या गुरुव्दारा गेट क्र. 6 जवळ 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात आरोपीला मदत करणार्‍या एकास अटक करण्यात राज्याच्या एटीएस पथकाला यश मिळाले आहे. त्यास आज नांदेडात आणल्यानंतर न्यायालयाने त्यास 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरच्या आरोपीस पंजाबातून अटक करण्यात आली आहे.

नांदेड येथे 10 फेब्रुवारी 2025 रोजी शहिदपूरा भागात दोघावर गोळीबार करण्यात आला. त्यात रविंद्रसिंग राठोड याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गोळीबार करणार्‍यास ज्यांना मारायचे होते तो गुरमितसिंग सेवादार याने कुख्यात अतिरेकी हरविंदसिंग उर्फ रिंधा याचा भाऊ सत्येंद्रसिंग उर्फ सत्या याचा खून केला होता. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यानंतर पॅरोलवर बाहेर आला होता.

10 फेब्रुवारी रोजी गोळीबार करणार्‍याने 10 गोळ्या झाडल्या होत्या. त्यात रविंद्रसिंघ राठोड या उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर गुरमितसिंग सेवादार हा जखमी झाला होता. त्यानंतर मुख्य आरोपी फरार झाला होता. या प्रकरणात यापूर्वी चार दिवसांपूर्वी मनप्रितसिंघ ढिल्लो आणि हरप्रितसिंग बाबूसिंघ कारपेंटर यांना आरोपीस मदत करण्याच्या कारणावरुन अटक केली होती. या दोघांना 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले होते. हा तपास राज्याच्या एटीएस शाखेकडे वर्ग करण्यात आला.

एटीएस पथकाने त्यांना मिळालेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये पथक पाठविले. पंजाबमधून अर्शदीपसिंi भजनसिंग यास अटक केली आहे. त्याने यातील मुख्य आरोपीला मदत केली असल्याचा एटीएसचा दावा आहे. अर्शदीपसिंगला याला आज सायंकाळी न्यायालयात हजर केले. त्याला 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;