छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शाळेत का शिकवला नाही? पूर्व क्रिकेटर आकाश चोप्रा याचा सवाल

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शाळेत का शिकवला नाही? पूर्व क्रिकेटर आकाश चोप्रा याचा सवाल

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘छावा’ चित्रपटाने रसिकप्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप निर्माण केलेली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण महाराजांची यशोगाथा आणि महाराजांच्या साहसाची चर्चा करु लागले आहे.  परंतु ”इतिहासामध्ये मात्र संभाजी महाराजांबद्दल फार काही माहिती नाही, तसेच संभाजी महाराजांचा फार कुठे उल्लेखही नाही” असे ‘एक्स’ या माध्यमाच्या माध्यमातून पूर्व क्रिकेटर आकाश चोप्रा याने काही प्रश्न विचारले आहेत.

आकाश चोप्रा असे म्हणाला की, इतक्या साहसी योद्ध्याबद्दल आपल्याकडे इतिहासात फारशी चर्चा का नाही, आपल्याला शाळेमध्ये संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती देखील कुणी दिली नाही. आपल्याला फक्त इतकेच शिकवले की, अकबर हा खूप मोठा साहसी आणि न्यायप्रिय राजा होता. हे इतक्यावरच थांबलं नाही तर हिंदुस्थानाच्या राजधानीमध्ये म्हणजे दिल्लीत अकबराच्या नावाने एका मार्गाचे नाव आहे.. हे असं का घडलं आणि केव्हा घडलं असे अनेक प्रश्न आकाशने ‘एक्स’ या माध्यमाद्वारे विचारले आहेत.
 ‘छावा’ चित्रपटाची निर्मिती ही ‘छावा’ या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवरून करण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशलने धर्मवीर संभाजी राजे यांची भूमिका वठवली आहे. ‘छावा’ या चित्रपटाने अल्पावधीतच चांगली बक्कळ कमाई केली असून, हा चित्रपट सध्याच्या घडीला देशासह- परदेशातही हिट चित्रपट म्हणून प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;