साताऱ्याच्या पठ्ठ्यानं नादच केला; परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी पॅराग्लायडिंग करत गाठलं कॉलेज, व्हिडीओ व्हायरल

साताऱ्याच्या पठ्ठ्यानं नादच केला; परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी पॅराग्लायडिंग करत गाठलं कॉलेज, व्हिडीओ व्हायरल

सातारा जिल्ह्यात एका विद्यार्थ्याने चक्क पॅराग्लायडिंग करत कॉलेज गाठले आहे. परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी पासरानी गावातील समर्थ महांगडे या विद्यार्थ्याने हा फंडा वापरला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

झाले असे की, पासरानी गावातील समर्थ महांगडे हा विद्यार्थी वाईतील किसन वीर महाविद्यालयात शिकतो. 15 फेब्रुवारी रोजी त्याची परीक्षा होती, मात्र त्याच दिवशी काही कामानिमित्त तो पाचगणी येथे गेला होता. तिथे भेटलेल्या ओळखीतील मुलाने त्याला आज परीक्षा असल्याची आठवण करून दिली. हातात वेळ होता फक्त अर्धा तास.

समर्थने वाईकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात वाहतूक कोंडी झाली होती. आता आपण काही वेळेत पोहोचत नाही आणि परीक्षा बुडणार म्हणून समर्थला टेन्शन आले होते. पण पाचगणीत पॅराग्लायडिंग करणारे जीपी एडव्हेंचर्स ग्रुपचे गोविंद येवले यांनी समर्थची मदत करण्याचे ठरवले. त्यांनी चक्क पॅराग्लायडिंग करत समर्थला पसरणीचा घाट पार करून दिला. समर्थ पॅराग्लायडिंग करत थेट कॉलेजला पोहोचला.

दरम्यान, समर्थ पॅराग्लायडिंग करत कॉलेजमध्ये पोहोचला आणि त्याने परीक्षाही दिली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या साहसाचे कौतुक होत आहे.

7588638613

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;