“सुव्रत आणि सारंग यांना पाहून तळपायाची आग मस्तकात गेली”,  छावा’मध्ये या मराठी अभिनेत्यांनी नेमकं असं काय केलंय?

“सुव्रत आणि सारंग यांना पाहून तळपायाची आग मस्तकात गेली”,  छावा’मध्ये या मराठी अभिनेत्यांनी नेमकं असं काय केलंय?

छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाल्यापासून प्रत्येकाच्या ओठांवर फक्त याच चित्रपटाच नाव आणि कौतुक आहे. सिनेमा पाहून प्रेक्षक चांगलेच भारावून गेले आहेत. विकीने संभाजी महाराजांची साकारलेली भूमिका पाहून सर्वांनीच त्याचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचंही तेवढंच कौतुक केलं जात आहे.

दरम्यान या चित्रपटात विकीपासून ते औरंगजेबाची भूमिका साकारलेल्या अक्षय खन्नापर्यंत सर्वांचेच अभिनय प्रेक्षकांना आवडले आहेत. पण या चित्रपटात अनेक मराठी कलाकारही आहेत. ज्यात संतोष जुवेकर, आशिष पाथोडे, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये. या सर्वांच्या हत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये यांची चर्चा

मराठी कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी तेवढंच उचलून धरलं आहे. पण यातील सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये यांची मात्र विशेष चर्चा होताना दिसतेय. कारण त्यांनी साकारलेल्या नकारात्म भूमिका. सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये यांनी कान्होजी आणि गणोजी शिर्के या भूमिका साकारल्या आहेत. आणि त्यांच्याच फितुरीमुळे संभाजी महाराजांनी कैद करणे औरंगजेबाच्या सैन्यांना शक्य होतं.

मात्र या सीनमुळे सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये या अभिनेत्यांवर सोशल मीडियावर अनेक कमेंट्स येत आहेत, यातील एक कमेंट म्हणजे ‘यांना पाहून तळपायाची आग मस्तकात गेली’ अशी होती. त्याचं कारण आहे चित्रपटातील तो सीन.

सीन असा आहे….

छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याकडून संगमेश्वर येथे कैद केल्याचा सीन या चित्रपटात आहे. सीनमध्ये आंबाघाटाच्या मार्गाने औरंगजेबाच्या सैन्याला रात्रीच्या अंधारात वाट दाखवली जाते आणि त्याचं 5 हजारांचं सैन्य महाराजांना कैद करण्यासाठी चालून येतं असतं. यावेळी आंबाघाटाचा कठीण मार्ग मुघलांना कसा सापडला ही शंका संताजीच्या मनात निर्माण होते आणि यातूनच फितुरी झाल्याचं उघड होतं.

फितुरीमुळे संभाजी महाराजांना कैद करणं शक्य झालं 

महाराजांकडे केवळ 150 मावळे असतात. तर, दुसरीकडे औरंगजेब महाराजांना कैद करण्यासाठी तब्बल 5 हजारांचं सैन्य येत असतं. या लढाईत अंताजी, रायाजी असे सगळेजण आपले प्राण गमावतात. शेवटी कान्होजी आणि गणोजी शिर्के यांनी केलेल्या फितुरीमुळे शंभूराजेंना कैद करणं औरंगजेबाच्या सैन्याला शक्य होतं असा संपूर्ण प्रसंग दाखवण्यात आला आहे.

गणोजी शिर्के हे महाराणी येसूबाईंचे बंधू व छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे होते. याच गणोजींची भूमिका चित्रपटात सारंग साठ्ये साकारत आहे. तर, कान्होजींच्या भूमिकेत सुव्रत जोशी आहे.

“सुव्रत आणि सारंग यांना पाहून तळपायाची आग मस्तकात गेली”

सुव्रत जोशीने चित्रपटाबद्दलचे अनेक रिव्ह्यूज त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. यातल्या एका रिव्ह्यूमध्ये “सुव्रत आणि सारंग यांना पाहून तळपायाची आग मस्तकात गेली” असं लिहिण्यात आलं आहे. यावरून दोघांनाही त्यांनी साकारलेल्या भूमिकांची पोचपावती मिळाली आहे.

सारंग आणि सुव्रत यांच्या भूमिका शेवटपर्यंत ‘छावा’मध्ये मोठा सस्पेन्स निर्माण करणाऱ्या आहेत. औरंगजेबाला जाऊन नेमकं कोण मिळालंय, हे सिनेमात गुप्त ठेवलेलं आहे. शेवटी जेव्हा या दोघांचे चेहरे उघड होतात, तेव्हा आपल्याच माणसांनी फितुरी केल्याची भावना प्रत्येकाच्या मनात दाटून येते. यामुळे सध्या सुव्रत आणि सारंग यांनी साकारलेल्या भूमिकांची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;