New Delhi Stampede- रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेवर काँग्रेस आक्रमक

New Delhi Stampede- रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेवर काँग्रेस आक्रमक

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. यावरून काँग्रेसने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा साधला आहे. या दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसतर्फे रेल्वेमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. जेव्हा रेल्वे स्थानकावर भीषण परिस्थिती उद्भवली होती. महिला त्यांची मुलं चेंगराचेंगरीच अडकले होते. तेव्हा अश्विनी वैष्णव चेंगराचेंगरीच्या बातम्या आणि तेथील मृतांचा आकडा लपवण्यात व्यस्थ होते, असा आरोपही काँग्रेसने केला आहे .


काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिल्लीतील चेंगराचेंगरीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी दुर्घटनेची सत्य परिस्थिती नागरिकांना दाखवली आहे. ‘नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर गैरव्यवस्थापनामुळे चेंगराचेंगरी झाली.’ अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. मुलेही मृत्युमुखी पडली. जेव्हा ही घटना घडत होती तेव्हा रेल्वेमंत्री सर्व काही ठीक असल्याचा दावा करत होते. चेंगराचेंगरीच्या बातम्या आणि तेथील मृतांचा आकडा लपवण्यात ते व्यस्थ होते. त्यामुळे अशा माणसाला मंत्रीपदावर राहण्याचा काहीही अधिकार नाहीए. रेल्वेमंत्र्यानी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे.

New Delhi Stampede – मृतांचा आकडा 18 वर, 14 महिलांचा समावेश

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;