एकता कपूर वादाच्या भोवऱ्यात, कोर्टाकडून चौकशीचे आदेश, हिंदुस्थानी भाऊने केली तक्रार

एकता कपूर वादाच्या भोवऱ्यात, कोर्टाकडून चौकशीचे आदेश, हिंदुस्थानी भाऊने  केली तक्रार

टीव्ही विश्वाची क्वीन एकता कपूर वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भारतीय सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी चित्रपट आणि टीव्ही निर्माती एकता कपूर हिच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या फौजदारी तक्रारीचा तपास करण्याचे आदेश मुंबईतील एका न्यायालयाने शनिवारी दिले. ही तक्रार एकता कपूरच्या एका वेब सीरिजबाबत केली होती, ज्या शोमध्ये भारतीय जवानांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हिंदुस्तानी भाऊने केली तक्रार…

वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांना 9 मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या कलमांतर्गत दंडाधिकारी फौजदारी तक्रारीची चौकशी करू शकतात किंवा पोलिसांना तसे करण्याचे निर्देश देऊ शकतात. सांगायचं झालं तर, एकता कपूर हिच्याविरोधत तक्रार युट्यूबर विकास पाठक म्हणजेच ‘हिंदुस्तानी भाऊ’ ने दाखल केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

 

विकास पाठक यांनी फक्त एकता कपूर हिच्यावरच नाही तर, याशिवाय एकताचे ओटीटी प्लॅटफॉर्म ऑल्ट बालाजी आणि तिचे आई-वडील शोभा आणि जितेंद्र कपूर यांचीही या तक्रारीत नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

वकील अली काशिफ खान देशमुख यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, ALTBalaji वर प्रसारित झालेल्या वेब सीरिजमध्ये एका लष्करी अधिकाऱ्याला आक्षेपार्ह कृत्य करताना दाखवण्यात आले होते. तक्रारीत म्हणण्यात आलं आहे की, ‘भारतीय लष्कराच्या लष्करी गणवेशात राष्ट्रीय चिन्हासह  आक्षेपार्ह कृत्य दाखवून आरोपींनी आपल्या देशाची प्रतिष्ठा आणि सन्मानाला ठेच पोहोचवली आहे…’

एकता कपूर हिच्याबद्दल  सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा एकता कपूरच्या फिल्म किंवा प्रोजेक्टमधील सीन्सवरुन लोकांनी आक्षेप नोंदवलाय. एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस 2’ सिनेमातील सीन्सवरुन वाद झाला होता. फिल्मचा ट्रेलर युट्यूबवर बॅन करण्यात आला होता. कोणत्या न कोणत्या कारणामुळे एकता कायम वादाच्या भोवऱ्यात असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;