संगमनेरमध्ये गोवंश जनावरांसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त, घारगाव पोलिसांची कारवाई; 10 जणांवर गुन्हा दाखल

संगमनेरमध्ये गोवंश जनावरांसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त, घारगाव पोलिसांची कारवाई; 10 जणांवर गुन्हा दाखल

बेकायदेशीर कत्तलखाने आणि गोवंशहत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या संगमनेरमध्ये सातत्याने गोवंशहत्या होत असल्याचे उघड होत आहे. यासंदर्भात घारगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, 17 गोवंश जनावरांची सुटका करत 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 16 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या खालची माहुली या नावाच्या शिवारात पुणे-नाशिक महामार्गावर साईबाबा मंदिरसमोर सहा वाहनांमध्ये गायी, वासरे चारा-पाण्याविना दाटीवाटीने बांधून भरून घेऊन जात असल्याचे आढळून आले.

बजरंग दलाचे कार्यकर्ते रोशन रमेश कवडे (रा. जवळेबाळेश्वर, ता. संगमनेर), ऋषिकेश सखाराम भोर आणि दादाभाऊ अण्णा खरात यांनी या गाड्या अडविल्या आणि संबंधितांवर घारगाव पोलिसांनी कारवाई करण्यासाठी माहिती देण्यात आली. माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 17 गोवंश जनावरांची सुटका करीत मुद्देमाल ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. जनावरांनी भरलेल्या सहा पिकअप व इतर गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या.

फारूख युसूफ सय्यद (रा. अलकानगर, संगमनेर), शहाबाज अझिझ शेख (रा. कुरण रोड, संगमनेर), शब्बीर शेख (रा. संगमनेर खुर्द, संगमनेर), संतोष सखाराम भिसे (रा. डिग्रज, तालुका संगमनेर), मोबीन शेखलाल शेख (रा. मदिनानगर, संगमनेर), साद शफिक शेख (रा. संगमनेर खुर्द, संगमनेर), अझिझ छोटू शेख (रा. संगमनेर खुर्द, संगमनेर), अजय सुरेश शिंदे (रा. हिवरे तर्फे, नारायणगाव), अजहर मोईन शेख (रा. संगमनेर खुर्द, संगमनेर), माणिक बाळू मोरे (रा. डिग्रस, ता. संगमनेर) अशा 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास घारगाव पोलीस करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;