एक जरी आरोपी सुटला तरी टोकाचे पाऊल उचलणार, धनंजय देशमुखांचा सरकारला इशारा

एक जरी आरोपी सुटला तरी टोकाचे पाऊल उचलणार, धनंजय देशमुखांचा सरकारला इशारा

संतोष देशमुख यांच्या हत्येला 75 दिवसांचा कालावधी उलटून गेला. अद्यापही एक आरोपी फरार आहे. त्यातच सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची झालेली भेट बीड जिल्हावासीयांना अस्वस्थ करणारी आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले, पहिल्या दिवसापासून मनोज जरांगे– पाटील आमच्यासोबत आहेत. आमचे गाव आमच्यासोबत आहे. या प्रकरणात एक जरी आरोपी सुटला तरी आपण टोकाचे पाऊल उचलणार, असा निर्वाणीचा इशारा सरकारला देत सर्वांना फाशी होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले.

धनंजय मुंडेंच्या विरोधात आरोपांची राळ उठवत मोठा लढा उभारणारे सुरेश धस धनंजय मुंडेंना दोनदा जाऊन भेटल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आमदार सुरेश धस यांच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी धस-मुंडे भेटीवर कोणतेही भाष्य केले नाही. सीआयडीच्या तपास पथकाने पडताळणीसाठी बोलावले होते, मात्र आज जाता आले नाही. लवकरच आम्ही सर्व देशमुख कुटुंब सीआयडीशी चर्चा करण्यासाठी जाणार आहोत आणि या हत्या प्रकरणात कोण कोण सहभागी होते हे सांगणार आहोत, असे देशमुख म्हणाले.

संतोष देशमुख यांची अतिशय अमानुषपणे हत्या झाली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. सर्वांना फाशी होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;