टाटा कर्व्ह एसयूव्हीने ओढले 48,000 किलोचे विमान
टाटा मोटर्सच्या टाटा कर्व्ह एसयूव्हीने तब्बल 48 हजार किलोचे विमान ओढून विक्रम रचला आहे. 1530 किलो वजनाच्या या कारने 48,000 किलो वजनाचे बोईंग 737 विमान ओढून आपली ताकद दाखवली. टाटा मोटर्सने पेट्रोल-डिझेलसह इलेक्ट्रिक पॉवरट्रेन पर्यायांमध्ये कर्व्ह सादर केली होती. आता या कारने विमान ओढून ही कार केवळ स्टायलिश कार नाही तर ती मजबूतही असल्याचे सिद्ध केले. कर्व्हमधील हायपरियन 1.2-लिटर जीडीआय इंजिन खूप शक्तिशाली आहे. या कारच्या पेट्रोल-डिझेल मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयांपासून सुरू होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List