केरळमध्ये तीन दिवसांत रॅगिंगची दुसरी घटना, पीडित विद्यार्थ्याचा हात मोडला; तिघांना अटक

केरळमध्ये तीन दिवसांत रॅगिंगची दुसरी घटना, पीडित विद्यार्थ्याचा हात मोडला; तिघांना अटक

केरळमध्ये गेल्या तीन दिवसांत रॅगिंगची दुसरी घटना घडली आहे. येथील कन्नूर जिल्ह्यातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील पाच विद्यार्थ्यांना एका ज्युनियरचा अमानुष छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 12 फेब्रुवारी रोजी घडलेली रॅगिंगची ही घटना आज उघडकीस आली. आदेश न पाळल्याबद्दल बारावीतील विद्यार्थ्यांनी अकरावीतील विद्यार्थी मोहम्मद निहालचा हात मोडला आणि बेदम मारहाण केली. अलीकडेच कोट्टायममधील एका नर्सिंग कॉलेजमध्ये पाच विद्यार्थ्यांनी तीन ज्युनियर विद्यार्थ्यांना नग्नावस्थेत मारहाण करून त्याचा व्हिडीओ काढला होता.

ज्युनियर विद्यार्थ्याचा हात मोडल्याप्रकरणी पाच विद्यार्थ्यांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली, तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध रॅगिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच शाळा प्रशासनाने पाचही आरोपींवर निलंबनाची कारवाई केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;