विधानसभेनंतर भाजपाचे महापौरपदासाठी फोडाफोडीचे राजकारण, आपच्या 3 नगरसेवकांचा पक्षप्रवेश; केजरीवाल यांना धक्का
फोडाफोडीचे राजकारण, ईव्हीएम घोटाळा आणि ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या आडून कारवाई करून विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबणाऱया भाजपने आता दिल्ली महापालिकेकडे मोर्चा वळवला आहे. महापालिकेवर आपला महापौर बसवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या तीन नगरसेवकांना आपल्याकडे ओढले आहे. या नगरसेवकांनी आपला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का मानला जात आहे.
या पक्ष प्रवेशामुळे महापालिकेतील समीकरणही बदलणार का याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आपचे नगरसेवक अनिता बसोया, धर्मवीर आणि निखिल रपराना यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
केजरीवाल यांच्या बंगल्याच्या चौकशीचे आदेश
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या 6, फ्लॅग स्टाफ रोड येथील बंगल्याच्या चौकशीचे आदेश केंद्रीय दक्षता आयोगाने दिले आहेत. त्यानुसार या संपूर्ण बंगल्याची तपासणी करण्यात येणार आहे. पेंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल आल्यानंतर याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या बंगल्यात नवे मुख्यमंत्री राहणार नाहीत अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे त्यांना वेगळे निवासस्थान देण्यात येण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List