मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात, बोगद्यात टेम्पो उलटल्याने वाहतूककोंडी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात, बोगद्यात टेम्पो उलटल्याने वाहतूककोंडी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नवीन बोगद्यात पाच वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण किरकोळ जखमी झाला. अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही; पण वाहनांचे मोठे नुकसान झाले. एक टेम्पो बोगद्यात उलटल्याने काहीकाळ वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ बोरघाटातील नवीन बोगद्यात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर शुक्रवारी पहाटे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये एकजण जखमी झाला. पाच वाहने एकमेकांवर आदळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. सिमेंट बल्कर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढील चार वाहनांना त्याची धडक बसून हा अपघात झाला.

या अपघातामध्ये सिमेंट बल्करचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात बोगद्यामध्ये एक टेम्पो उलटला असून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात वेळ गेल्याने मार्गावर काहीकाळ वाहतूककोंडी झाली होती. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. टेम्पो बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

दरम्यान, या घटनेमुळे मुंबई मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, काही काळानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;