अहिल्यानगरमध्ये आजपासून ‘प्रतिबिंब’ चित्रपट महोत्सव सुरू, देश-विदेशातील चित्रपट, लघुपट, माहितीपट प्रदर्शित होणार

अहिल्यानगरमध्ये आजपासून ‘प्रतिबिंब’ चित्रपट महोत्सव सुरू, देश-विदेशातील चित्रपट, लघुपट, माहितीपट प्रदर्शित होणार

अहिल्यानगर  येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिबिंब या चित्रपट, लघुपट व माहितीपट महोत्सवाला सुरुवात होत आहे. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मृती दिनानिमित्त 15 ते 18 फेब्रुवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

यावर्षीच्या चित्रपट महोत्सवाची थीम ‘रहस्य’ ही असून, देश-विदेशातील विविध भाषांतील चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. याबरोबरच देशभरातून स्पर्धेसाठी आलेले लघुपट व माहितीपट पाहाता येणार आहेत. तसेच, राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून, तेही पाहण्यासाठी सर्वांसाठी चार दिवस खुले राहणार आहे. हा चित्रपट महोत्सव सर्वांसाठी खुला व मोफत असून, रसिकांनी त्याचा आवर्जून लाभघ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले आहे.

15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते प्रतिबिंब चित्रपट महोत्सव व फोटोग्राफी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता ‘अंदाधुंद’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुपारी द ग्रीन माईल व संध्याकाळी शटर आयलँड हे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

16 फेब्रुवारी रोजी सकाळी प्रसिद्ध दिग्दर्शक दिवंगत श्याम बेनेगल यांच्या स्मरणार्थ ‘अंकुर’ हा चित्रपट दाखविण्यात येईल. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून स्पर्धेतील माहितीपट व संध्याकाळी 6 वाजल्यापासून लघुपट दाखविण्यात येतील. 17स्पर्धेतील विद्यार्थी व खुल्या गटातील लघुपटांचे प्रदर्शन होईल. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून उर्वरित लघुपट स्पर्धा पार पडेल. दुपारी 2 वाजल्यापासून उपस्थितांना परीक्षकांशी संवाद साधता येईल. या चारही दिवस हा महोत्सव पाहण्यासाठी दररोज सकाळी 9 ते रात्री 9 या दरम्यान खुला असेल. शहरातील रसिकांनी या महोत्सवास अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संज्ञापन अभ्यास विभागातर्फे करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;