184 cc इंजिन, ड्युअल-चॅनल एबीएस; Honda NX200 लॉन्च, किंमत किती?

184 cc इंजिन, ड्युअल-चॅनल एबीएस; Honda NX200 लॉन्च, किंमत किती?

Honda Motorcycle & Scooter India ने आपली नवीन बाईक Honda NX200 लॉन्च केली आहे. या बाईकमध्ये अनेक नवीन फीचर्ससह इंजिन देखील अपडेट करण्यात आले आहे. या बाईकचे डिझाईन स्पोर्टी आणि स्टायलिश आहे. ही बाईक कंपनीच्या प्रीमियम डीलरशिपवरच उपलब्ध असेल.  नवीन Honda NX200 ची एक्स-शोरूम किंमत 1.68 लाख रुपये आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

Honda NX200 फीचर्स

नवीन Honda NX200 मध्ये नवीन TFT डिस्प्ले आणि ड्युअल-चॅनल ABS सारखे जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहे.  Honda ने आपल्या CB200X चे रीब्रँड NX200 नावाने केले आहे.  फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Honda NX200 मध्ये TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा देखील असेल.  यामध्ये, रायडर्सना कॉल/मेसेज अलर्टसारखे स्मार्ट फीचर्स मिळतात.

इंजिन

Honda NX200 मध्ये 184 cc, सिंगल-सिलेंडर इंजिनचे देण्यात आले आहे. हे इंजिन 12.5 kW ची पॉवर आणि 15.7 Nm टॉर्क जनरेट करते.  हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

सेफ्टी फीचर्स

ही बाईक डिस्क ब्रेकसह ड्युअल-चॅनल एबीएसने सुसज्ज आहे.  होंडाच्या प्रीमियम डीलरशिपवर याची बुकिंग सुरू झाली आहे.  याची डिलिव्हरी मार्च 2024 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;