भगवद्गीता ही भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा ! लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले मत

भगवद्गीता ही भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा ! लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले मत

भौतिक जीवन जगत असताना अनेकदा आपल्यावर अनेक संकटे येतात. त्यावेळी नेमके काय करावे, कसे वागावे, हे कळत नाही. अशा परिस्थितीतच भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलेली शिकवण ही आजही 21व्या शतकात उपयोगी पडते. भौतिक जीवनामध्ये आदर्श जीवनपद्धती कशी जगावी, याचा मार्ग भगवद्गीतेमध्ये सांगितला आहे. भगवद्गीता ही भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

अभिताभ होनप लिखित ‘मी गीता बोलतीय’ या भगवद्‌गीतेचे उत्कंठावर्धक वर्णन करणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी भारतीय पुस्तक न्यासाचे विश्वस्त राजेश पांडे, गीता धर्म मंडळाच्या कार्यवाह विनया मेहंदळे, लेखक धनंजय गोखले, जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, लेखक अभिताभ होनप उपस्थित होते. यावेळी धनंजय गोखले, डॉ. शहा आणि विनया मेहेंदळे यांनी पुस्तकामागील भूमिका मांडली.

स्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मुग्धा नलावडे यांनी अभिवाचन केले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;