लग्नात पोहोचला बिबटय़ा; पाहुण्यांची उडाली तारांबळ
लखनऊमध्ये एका लग्नात अचानक एका बिबटय़ाने एण्ट्री मारली आणि लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची तसेच वधू आणि वराकडील मंडळींची पाचावर धारण बसली. जिकडे तिकडे आरडाओरड आणि धावपळ सुरू झाली. बुधवारी रात्री लग्नसोहळा सुरू असताना ही घटना घडली. बिबटय़ाबद्दल समजताच वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी लग्न स्थळावर पोहोचले आणि पहाटे तीन वाजता या बिबटय़ाला पकडण्यात आले. त्यानंतर पुन्हा लग्नसोहळय़ाला सुरुवात झाली आणि सर्वकाही सुरळीत पार पडले. पकडलेल्या बिबटय़ाला दुधवा नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.
भाजप म्हणेल तो ओव्हरसाईज बोका होता – अखिलेश यादव
भाजपच्या भ्रष्टाचारामुळेच जंगले नष्ट होत आहेत आणि वन्य प्राणी शहरात घुसत आहेत. लग्नात बिबटय़ा घुसण्याच्या घटनेला सरकार गांभीर्याने घेईल की नाही हे माहीत नाही किंवा तो ओव्हरसाईज बोका होता असे सांगून हात झटकेल. अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सरकारवर निशाणा साधला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List