ईदची सुट्टी रद्द, 31 मार्चला बँका सुरू;  आरबीआयचा निर्णय 

ईदची सुट्टी रद्द, 31 मार्चला बँका सुरू;  आरबीआयचा निर्णय 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना 31 मार्च 2025 ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 31 मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्याने यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

रमजान ईद निमित्त हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये 31 मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता. 31 मार्च 2025 रोजी संपणाऱ्या 2024-25 या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याप्रमाणे मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी आदी शहरांत  31 मार्च रोजी बँकांना सुट्टी नसेल.

1 एप्रिल रोजी बँकांना सुट्टी

1 एप्रिल (मंगळवार) रोजी मेघालय, छत्तीसगड, मिझोराम, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि मेघालय वगळता बुहतेक केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;